esakal | कावळा घेतोय एकाचा तीन वर्षांपासून बदला...
sakal

बोलून बातमी शोधा

crows target MP man in 3 year old vengeance

कावळा एका व्यक्तीचा सलग तीन वर्षांपासून बदला घेत असून, तो घराबाहेर पडली की कावळा जवळ येऊन डोक्यावर चोच मारून जखमी करतो.

कावळा घेतोय एकाचा तीन वर्षांपासून बदला...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ (मध्य प्रदेश) : एक कावळा एका व्यक्तीचा सलग तीन वर्षांपासून बदला घेत असून, तो घराबाहेर पडली की कावळा जवळ येऊन डोक्यावर चोच मारून जखमी करतो. याप्रकारामुळे त्या व्यक्तीला हातात काठी घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे.

माणूस माणसाचा बदला घेत असल्याचे पहायला मिळते. परंतु, येथे कावळा माणसाचा तीन वर्षांपासून बदला घेत आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील ही घटना आहे. शिवपुरी जिल्ह्यातील बदरवास जनपद परिसरातील शिवा केवट यांच्यावर गेल्या तीन वर्षांपासून कावळा हल्ला करत आहे. शिवा घराबाहेर पडले की कावळा येतो अन् चोच मारायला सुरवात करतो. शिवाला आपल्या सुरक्षेसाठी आता काठी घेऊन फिरावे लागत आहे किंवा रात्री अंधाराच्या वेळी तो घरातून बाहेर पडतो. कावळा माझ्या पाठीमागे का लागला आहे, याचा विचार केला. एक घटना आठवून सांगताना शिवा म्हणाले, तीन वर्षापूर्वी बदरवास येत असताना रस्त्यात मला एक कावळ्याचे पिल्लू जाळीमध्ये अडकलेले दिसले. पिल्लाची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. पण, दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला. तेव्हा पासून कावळा माझ्यावर हल्ला करू लागला आहे.'

दरम्यान, सर्व सामान्यपणे कावळ्यांमध्ये बदला घेण्याची प्रवृत्ती असते. जर त्यांना कुणी त्रास देत असेल, तर त्यांचा चेहरा ते लक्षात ठेवतात. कारण त्यांची बुद्धी तल्लख असते. कावळ्यांचे डोकं इतर पक्षांपेक्षा तुलनेने मोठे असते. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती चांगली असते. ते सहजपणे माणसाचा चेहरा लक्षात ठेवतात आणि अनेक वर्ष ते विसरत नाहीत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

loading image
go to top