सहकारी जवानांची हत्या का केली? CRPF जवानाचा व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

४ सहकाऱ्यांची हत्या का केली? CRPF जवानाचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओत सीआरपीएफ किंवा पोलिस अधिकारी चौकशी करताना ऐकू येत आहे. यात रितेशने सर्वाकाही सांगितलं आहे.

४ सहकाऱ्यांची हत्या का केली? CRPF जवानाचा व्हिडिओ व्हायरल

sakal_logo
By
टीम ई सकाळ

छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यातील मरईगुडा सीआऱपीएफ कँपमध्ये चार सहकारी जवानांवर गोळीबार करणाऱ्या जवानाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यामध्ये आरोपी जवान अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीवेळी आपला गुन्हा मान्य करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओमध्ये आरोपी जवानाने म्हटलं की, सहकारी जवानांनी माझ्या पत्नीचं अकाउंट हँक केलं होतं. ते लोकं माझ्या पत्नीसोबत अशी गोष्ट करणार होते जी करायला नको होती. त्यामुळेच मी गोळ्या झाडल्या. रितेश रंजन असं आरोपी जवानाचे नाव असून त्याने केलेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले.

सुकमामधील मरईगुडा कँपमध्ये ८ नोव्हेंबरला रितेश रंजनने सहकारी जवानांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. व्हिडिओ गोळीबार झाला त्यादिवशी सकाळचा असल्याचे समजते. यात रितेश रंजनला कँपच्या परिसरात बांधून घातल्याचं दिसत आहे. व्हिडिओत सीआरपीएफ किंवा पोलिस अधिकारी चौकशी करताना ऐकू येत आहे. यात रितेशने सर्वाकाही सांगितलं आहे. तसंच सहकारी जवान सतत त्रास देत होतो असंही रितेशने म्हटलं. याची माहिती इन्स्पेक्टरला दिली होती मात्र त्यांनी काही केलं नाही असा दावाही रितेशने याव व्हिडिओमध्ये केला आहे.

व्हायरल व्हिडिओमधील संवाद

प्रश्न - तु हे काय केलंस, रात्री सहकाऱ्यांवर गोळीबार केलास?

रितेश - माझं नाव रितेश रंजन आङे, मी सहकाऱ्यांवर गोळीबार केला. त्यांनी माझ्या बायोकचं फेसबुक आणि काय काय हॅक केलं माहिती नाही. मी त्यांची तक्रार इन्स्पेक्टरकडे केली होती. त्यांचे फेसबुक चेक करा माहिती मिळेल त्यांनी काय काय हॅक केलं. मला सतत टोमणे मारायचे. लाइनवर जो हल्ला झाला त्याचे रेकॉर्डिंगसुद्धा तुमच्याकडे पाठवलं आहे.

प्रश्न - सहकाऱ्यांना गोळी मारलीस यातून तुला काय मिळालं?

उत्तर - ते म्हणायचे की असं करू तसं करू जे केलं नाही पाहिजे.

प्रश्न - तु वरिष्ठांना का सांगितलं नाहीस?

उत्तर - मलाच टार्गेट केलं जात होतं.

हेही वाचा: पाकिस्तानच्या माजी सैनिकाचा भारतात पद्म श्री पुरस्काराने सन्मान

सीआरपीएफ ५० बटालियनमध्ये रितेश रंजन तैनात आहे. तो रात्रपाळीवर तैनात असताना मध्यरात्री अचानक कॅम्पमध्ये गोळीबार केला. त्यामुळे खळबळ माजली होती. कॅम्पमधीलच चार जवानांचा जागेवरच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

loading image
go to top