esakal | पुलवामा हल्ल्याला एक वर्ष : सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन
sakal

बोलून बातमी शोधा

Pulwama.jpg

पुलवामा हल्ल्याला एक वर्ष : सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेल्या स्मारकाचे उद्घाटन

sakal_logo
By
वृत्तसंस्था, वृत्तसंस्था

श्रीनगर : गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफच्या 40 जवानांच्या स्मृतीस्थानी बांधलेल्या स्मारकाचे आज लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन झाले. या हल्ल्याच्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले.

दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शहा आदींनी ट्विवट करत हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली. वर्षभरापूर्वीच्या या दिवसाचा इतिहास जम्मू-काश्मीरमधील एक अतिशय दुःखद घटना म्हणून नोंदविला गेला आहे. गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... असं म्हणत CRPF ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

यामध्ये तुमच्या शौर्याचं गीत कर्कश गोंधळात हरवलं नाही. अभिमान इतका होता की रडलो नाही. आम्ही विसरलो नाही आणि आम्ही माफ केलं नाही. पुलवामामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या आमच्या बांधवांना आमचा सलाम. आम्ही त्याच्या कुटुंबियांसमवेत खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे आहोत असं ट्विट सीआरपीएफने केलं आहे.  

आज हुतात्मा झालेल्या ठिकाणी स्मृतीस्मारक बांधण्यात आले आहे आज त्याचे लेथपुरा कॅम्पमध्ये उद्घाटन झाले. यावेळी हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे. पुलवामा हल्ल्यातील जवानांचे बलिदान देश कधीच विसरणारही नाही; असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. गृह मंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे.

यावेळी शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मारकामध्ये शहीद जवानांच्या नावासोबत त्यांचे फोटोही लावण्यात आले आहेत. या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ध्येय वाक्य "सेवा आणि निष्ठा" असे लिहिले आहे. या भ्याड हल्यात शहीद झालेल्या जवानांच्या घरी जात उमेश गोपीनाथ जाधव यांनी त्यांचा अंत्यविधी झालेल्या ठिकाणची पवित्र माती त्यांच्या गावी जाऊन जमा करून यावेळी येथील स्मारकामध्ये ठेवण्यासाठी दिली.  

बुलेट प्रूफ तयार करण्याची प्रक्रिया वेगवान- सैनिकांना घेऊन जाणारी वाहने बुलेट प्रूफ करण्याची प्रक्रिया वेगवान झाली. त्यामुळे रस्त्यावर बंकरसारखी वाहने दिसली. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद डार यांनी स्फोटकांनी भरलेल्या कारमध्ये सुरक्षा दलाच्या ताफ्याशी धडक दिली. त्या जागेजवळ सीआरपीएफ छावणीच्या आत हे स्मारक तयार केले गेले आहे.

या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातील जवळपास सर्व कट रचणारे ठार झाले असून गेल्या महिन्यात जैश-ए-मोहम्मदचा स्वयंभू प्रमुख कारी यासिर याला ठार मारण्यात यश आले आहे.

loading image