UP: छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठात राज्यातील पहिले कॅम्पस रुग्णालय; सुमारे ५० लाख नागरिकांना मिळणार दर्जेदार आरोग्यसेवा

CSJMU to Launch Uttar Pradesh's First Campus Hospital: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये CSJMU कॅम्पस रुग्णालय आणि IIT कानपूर रुग्णालय मुळे आरोग्य सेवेला मोठी चालना मिळणार आहे.
UP

UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील कानपूर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ५० लाख नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी कानपूरमध्ये दोन अत्याधुनिक रुग्णालये उभारली जात आहेत. सध्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण गणेश शंकर विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होतात. वाढती गर्दी लक्षात घेता आता छत्रपती शाहूजी महाराज विद्यापीठ आणि आयआयटी कानपूर परिसरात नवी रुग्णालये उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही रुग्णालयांमुळे नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com