एअर इंडियावर मोठा सायबर हल्ला, 45 लाख प्रवाशांचा डेटा चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Air India

एअर इंडियावर मोठा सायबर हल्ला, 45 लाख प्रवाशांचा डेटा चोरीला

नवी दिल्ली: एयर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आलीये. डेटा सेंटरवर सायबर हल्ला (Cyber Attack) झाला असून यात जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा लीक झाला आहे. भारतासह इतर देशातील प्रवाशांचाही यात समावेश आहे. अनेक प्रवासांच्या क्रेडिट कार्डची (Credit Card Details) माहितीही चोरीला गेली आहे. एअर इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. एअर इंडियाने शुक्रवारी एक निवदेन जारी करुन यासंदर्भातील माहिती दिली. प्रवाशांची वैयक्तिक माहिती स्टोअरिंग आणि प्रोसेसिंग SITA PSS सर्व्हरवर हा सायबर हल्ला झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. 26 ऑगस्ट, 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 पर्यंतचा डेटा चोरीला गेल्याचे कंपनीने म्हटले आहे. (Cyber attack on air India Theft Of Personal Data And Credit Card Details Of 45-Lakh Passengers)

हेही वाचा: झटक्यात बरं करणाऱ्या औषधासाठी तोबा गर्दी; ICMR करणार चाचणी

या सायबर हल्ल्यामध्ये प्रवाशांची नावे, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पासपोर्ट डिटेल्स यासह क्रेडिट कार्डसंदर्भातील माहितीही लीक झालीये. एअर इंडिया कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्डची माहिती लीक झाली असली तरी सीवीवी/सीवीसी नंबर डेटा प्रोसेसचा भाग नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. खबरदारीसाठी ग्राहकांनी आपापल्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलावा, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा: 'डोन्ट वरी! कोरोना सर्दी-खोकल्यासारखाच होणार सामान्य'

25 फेब्रुवारीला एअर इंडियाला डेटा उल्लंघनासंदर्भात प्रोसेसरकडून पहिली सूचना मिळाली होती. 25 मार्च आणि 5 एप्रिलला प्रभावित डेटासंदर्भात माहिती मिळाली. 19 मार्च रोजी एअर इंडियने एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून डेटा लीक झाल्याची माहिती दिली होती. डेटा सुरक्षितेतेच्या दृष्टीने यासर्व प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. डेटा सुरक्षिततेच्यासंदर्भात एक्सटर्नल स्पेशलिस्ट कार्यरत असून एअर इंडियाच्या एफएफपी प्रोग्रामचा (frequent flyer programme) पासवर्ड देखील बदलण्याचे काम सुरु आहे. पुढील सुरक्षिततेसाठी ग्राहकांनी आपला पासवर्ड बदलावा, असे आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.

loading image
go to top