
चेन्नई : गेल्या तीन दिवसांपासून फेइंजल चक्रीवादळामुळे तमिळनाडू आणि पुदुच्चेरीत हाहा:कार उडाला असून तिरुवन्नामलाई येथे भूस्खलन झाल्याने तब्बल ४० टन वजनाचा दगड दोन घरांवर पडल्याचा प्रकार घडला. त्याखाली सात जण दबलेले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. फेइंजल चक्रीवादळामुळे केरळ, तेलंगण, कर्नाटक आणि आंध्रात देखील पाऊस पडत आहे.तसेच येत्या दोन दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.