Dadi Ratan Mohini : प्रजापिता ब्राह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासक राजयोगिनी दादी रतनमोहिनी यांचे सोमवारी रात्री १०१ व्या वर्षी अहमदाबादमधील जायडस रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ब्राह्माकुमारी संस्थेवर मोठा शोक व्यक्त केला जात आहे.
आबू रोड, (राजस्थान) : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या मुख्य प्रशासक राजयोगिनी ब्रह्माकुमारी दादी रतनमोहिनी (वय १०१) यांचे सोमवारी (ता.७) रात्री सव्वाच्या सुमारास अहमदाबाद येथील जायडस रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले.