लोकसभा पोटनिवडणूक: शिवसेनेचं सीमोल्लंघन, कालाबेन डेलकर विजयी

५१,३०० मताधिक्क्याने कालाबेन डेलकर यांनी विजय मिळवला.
Shivsena-bjp
Shivsena-bjpsakal

नवी दिल्ली: दादरा आणि नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत (Ls by election) शिवसेनेच्या उमेदवार कालाबेन डेलकर (kalaben delkar) यांनी विजय मिळवला आहे. कालाबेन डेलकर यांच्या रुपाने महाराष्ट्राबाहेर प्रथमच शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. माजी खासदार मोहन डेलकर यांच्या त्या पत्नी आहेत. मोहन डेलकर यांनी मुंबईतील हॉटेलमध्ये आत्महत्या केली होती. त्यांच्या मृत्यूमुळे दादरा आणि नगर हवेलीमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक झाली.

५१,३०० मताधिक्क्याने कालाबेन डेलकर यांनी विजय मिळवला. त्यांनी भाजपा उमेदवार महेश गावित यांचा पराभव केला. २२ फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर कालाबेन डेलकर यांना १ लाख १२ हजार ७४१ मते मिळाली. भाजपा उमेदवार महेश गावित यांना ६३ हजार ३८२ मते मिळाली.

Shivsena-bjp
एका खड्डयाने सारं संपवलं, इंजिनिअरचा मनाला चटका लावणारा शेवट

मोहन डेलकर यांच्या मृत्यूमुळे पोटनिवडणूक झाली. २०१९ मध्ये भाजपाच्या नथुभाई पटेल यांचा ९ हजार मतांनी पराभव करुन मोहन डेलकर यांनी निवडणूक जिंकली होती. पण त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केलीय. या आत्महत्येच्या मागे दादरा नगर हवेलीत भाजपने जे प्रशासक बसवले होते ते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय. राजकीय कारकिर्दीत त्यांनी शिवसेना आणि भाजपा दोघांकडून पदे भूषवली. दादरा, नगर आणि हवेलीमधून त्यांनी सातवेळा लोकसभेची निवडणूक जिंकली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com