Dahi Handi 2026: २६ सेकंदांत मानवी मनोरा रचला; शिव शक्ती जानकी दल ठरले दहीहंडी स्पर्धेचे विजेते!

Shiv Shakti Janaki Dal Wins Dahi Handi Competition: रांचीच्या मोरहाबादी मैदानावर श्रीकृष्ण जन्मोत्सव-२०२६ उत्साहात साजरा करण्यात आला.दहीहंडी स्पर्धेत शिव शक्ती जानकी दलाने अवघ्या २६.०९ सेकंदांत मानवी मनोरा रचत विजेतेपद पटकावले.
Dahi Handi 2026

Dahi Handi 2026

esakal

Updated on

रांचीच्या ऐतिहासिक मोरहाबादी मैदानावर श्रीकृष्ण जन्मोत्सव-२०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. जन्माष्टमी आयोजन समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्याला हजारो शहरवासीयांनी उपस्थिती लावली. संपूर्ण मैदान ‘जय श्रीकृष्ण’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी स्वतः मटकी फोडून दहीहंडी स्पर्धेचा शुभारंभ केला. दहीहंडी स्पर्धेसोबतच बाल गोपाळ वेशभूषा स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला विशेष रंगत आणली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com