Dalai Lama Successor: मृत्यूनंतरच उत्तराधिकारी : दलाई लामांची ऐतिहासिक घोषणा
Dalai Lama Announces Successor Will be Revealed After Death: दलाई लामांनी त्यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकाऱ्याची निवड तिबेटी बौद्ध परंपरेनुसार केली जाईल, असे जाहीर केल्याने जगभरातील अनुयायांना दिलासा मिळाला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की या निवडीसाठी केवळ गादेन फोडरंग ट्रस्ट जबाबदार असेल.
धर्मशाळा : ‘माझा मृत्यू झाल्यानंतर उत्तराधिकाऱ्याची निवड केली जाईल,’ असे तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी बुधवारी जाहीर केले. त्यामुळे दलाई लामांची ६०० वर्षांपासूनची परंपरा जपली जाणार असल्याचा दिलासा जगभरातील बौद्ध अनुयायांना मिळाला आहे.