दरभंगा (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आईबद्दल अयोग्य आणि अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद रिझवी उर्फ ‘राजा’ असे आरोपीचे नाव असून, तो दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडा पोलीस ठाण्याच्या भोपुरा गावचा रहिवासी आहे.