Mahua Moitra: मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अदानींवर टीका; दर्शन हिरानंदानींच्या दाव्यामुळे महुआ मोईत्रा अडचणीत

Mahua Moitra
Mahua Moitra

नवी दिल्ली- रियल इस्टेट ते एनर्जी समूह हिरानंदानीचे सीईओ दर्शन हिरानंदानी यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे महुआ मोईत्रा या अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी अदानी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती, असा दावा दर्शन हिरानंदानी यांनी केला आहे.

महुआ मोईत्रा यांनी गौतम अदानी यांच्यावर संसदेत टीका करण्यासाठी दर्शन हिरानंदानी यांच्याकडून 'गिफ्ट' घेतल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता. तसेच महुआ मोईत्रा यांनी आपल्या लोकसभेच्या वेबसाईटचे लॉगिन-पासवर्ड दर्शन हिरानंदानी यांना दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. या आरोपांना दर्शन हिरानंदानी यांनी दुजोरा दिला आहे. (Darshan Hiranandani allegedly paid TMC MP Mahua Moitra to raise questions in Parliament about Adani Group)

Mahua Moitra
Adani Group: अदानी समूहाची पहिल्यांदाच खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर टीका; म्हणाले, आमची प्रतिमा...

मोईत्रा यांनी गिफ्ट घेतले!

दर्शन हिरानंदानी यांनी एक पत्र जाहीर केलं आहे. त्यांनी यात त्यांच्यावर झालेले आरोप स्वीकारले आहेत. इंडियन ऑयल कॉरपोरेशन (आयओसी) कडून गुजरातमधील धामरा एलएजी आयात सुविधा अदानी समुहाला मिळाल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यासाठी खासदार मोईत्रा यांचे लॉगिन वापरल्याचं त्यांनी म्हटलंय. मोईत्रा यांनी याबदल्यात महागड्या वस्तू, दिल्लीतील घराची सजावट, प्रवास खर्च इत्यादीसाठी मदत मागितल्याचं आणि ती पुरवण्यात आल्याचं हिरानंदानी म्हणाले आहेत.

मोईत्रा यांनी ईमेल आयडी मला दिला होता. जेणेकरुन मी त्यांना माहिती देऊ शकेन. हे प्रश्न त्या संसदेमध्ये विचारायच्या. त्यानंतर त्यांनी मला लॉगिंन आणि पासवर्ड दिला, या माध्यमातून मी स्वत: थेट प्रश्न संसदेच्या वेबसाईटवर पोस्ट करु शकत होतो, असा दावा दर्शन हिरानंदानी यांनी केलाय.

Mahua Moitra
Mahua Moitra: महुआ मोईत्रा यांनी ठोकला मानहानीचा दावा, खासदार दुबे आणि वकील देहदराई यांनी लाचखोरीचे केले होते आरोप

प्रसिद्धीसाठी मोदींवर टीका?

२०१७ मध्ये मोईत्रा आमदार होत्या. तेव्हा बंगाल ग्लोबल बिझनेज समिटमध्ये माझी त्यांच्याशी भेट झाली. त्यानंतर मोईत्रा माझ्या चांगल्या मित्र झाल्या. त्यानंतर २०१९ मध्ये कृष्णानगरमधून त्या खासदार झाल्या. मोईत्रा खूप महत्त्वाकांक्षी आहेत. त्यांना देश पातळीवर आपलं नाव करायचं होतं.

त्यांच्या मित्रांनी सल्ला दिला होता की प्रसिद्धी मिळवायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ला करा. मोदी टीका करण्याची एकही संधी देत नाहीत. त्यामुळे त्यांनी अदानीच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली, असा दावा हिरानंदानी यांनी केलाय. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com