DaughtersDay : का साजरा करण्यात येतो, जाणून घ्या

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 September 2019

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहिम भारतात सुरु असताना आजचा DaughtersDay हा साजरा होणे आवश्यक आहे. मुलींना जन्मापूर्वीच मारणे, घरगुती हिंसाचार, हुंडा, अत्याचार अशा अनेक घटनांना बळी पडावे लागते. त्यामुळे DaughtersDay मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 

नवी दिल्ली : भारतात आज (22 सप्टेंबर) DaughtersDay साजरा करण्यात येत असून, सोशल मीडियावर मुलीसोबतचा फोटो शेअर करण्यात जणू काही स्पर्धाच लागली आहे. पण, DaughtersDay आज का साजरा करतात हे जाणून घेऊया.

मुलींसाठी साजरा करण्यात येत असलेला DaughtersDay जगभरात वेगवेगळ्या दिवशी साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी प्रत्येक आई-बाप आपल्या मुलीला आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण, काही जणांनी या एका दिवसाची गरज काय, असे प्रश्नही उपस्थित केले आहेत. सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी DaughtersDay साजरा करण्यात येतो. त्यामुळे आज हा साजरा होत आहे. तर, WorldDaughtersDay 28 सप्टेंबरला साजरा होईल.

बेटी बचाओ, बेटी पढाओ ही मोहिम भारतात सुरु असताना आजचा DaughtersDay हा साजरा होणे आवश्यक आहे. मुलींना जन्मापूर्वीच मारणे, घरगुती हिंसाचार, हुंडा, अत्याचार अशा अनेक घटनांना बळी पडावे लागते. त्यामुळे DaughtersDay मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: daughters day 2019 in india happy daughter day daughter day wishes