
6 ते 12 वर्षांच्या मुलांचा लसीकरणाचा मार्ग मोकळा; DGCI ची परवानगी
नवी दिल्ली : भारताच्या ड्रग्ज कंट्रोलर जनरलने (DGCI) भारत बायोटेकला (Bharat Biotech) 6 ते 12 वर्षे वयोगटातील लोकांसाठी कोवॅक्सिनला (Covaxin) प्रतिबंधित आणीबाणीच्या वापराची परवानगी दिली आहे. ही परवानगी देताना DGCI ने भारत बायोटेकला पहिल्या दोन महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी आणि त्यानंतर पाच महिन्यांसाठी दर 15 दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांसह सुरक्षा डेटा सबमिट करण्यास सांगितले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोविड लसीकरण करण्यात आले होते. (DGCI Cleared Covaxin For Kids Aged 6 to 12 Years)
21 एप्रिल रोजी, DCGI च्या विषय तज्ञ समितीने (SEC) भारत बायोटेकला 2-12 वयोगटातील मुलांसाठी Covaxin लसीबाबत अतिरिक्त डेटा प्रदान करण्यास सांगितले होते. कोरोना विषाणूच्या शेवटच्या लाटेत लहान मुलांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु कोरानाच्या नवीन XE विषाणूची लागण होणाऱ्यांमध्ये लहानमुलांची संख्या लक्षणीय आहे.
दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर या विषाणुमुळे बाधितांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची भीती आहे. त्याशिवाय आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गेल्या तीन आठवड्यांत मुलांमध्ये फ्लूसारखी लक्षणे वाढली आहेत. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर कोव्हॅक्सीन लसीला मिळालेली परवानगी महत्त्वाची मानली जात असून, मंजुरी मिळाल्यानंतर, सरकार लवकरच लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करू शकते. ज्यामध्ये या वयोगटातील मुलांचे लसीकरण देशात केव्हा आणि कसे सुरू केले जाईल हे सांगितले जाईल. याशिवाय पॅनेलने 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी जैविक ई च्या कॉर्बेव्हॅक्सला आपत्कालीन वापराची अधिकृत मंजूर करण्याची शिफारस केली आहे.
Web Title: Dcgi Granted Permission To Use Covaxin For 6 To 12 Years
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..