सीमावाद सुरु असतानाच फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले, मला कन्नड भाषा.. I Devendra Fadnavis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis Kannad Speech

महाराष्ट्र सरकारनंही सीमावादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत बेळगांव, कारवार, भालकी, निपाणी ताब्यात घेण्याचा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे.

Devendra Fadnavis : सीमावाद सुरु असतानाच फडणवीसांची कन्नडमधून भाषणाला सुरुवात; म्हणाले, मला कन्नड भाषा..

Devendra Fadnavis Kannad Speech : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद (Karnataka-Maharashtra Border Dispute) चांगलाच उफाळला आहे. या वादात केंद्र सरकारही वेळोवेळी आपली भूमिका बजावत आहे.

महाराष्ट्र सरकारनंही सीमावादाबाबत आपली भूमिका स्पष्ट करत बेळगांव, कारवार, भालकी, निपाणी ताब्यात घेण्याचा इशारा कर्नाटक सरकारला दिला आहे. मात्र, असं असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्नाटकातील चिक्कमंगलुरू येथील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यावेळी कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी थेट कानडी भाषेतून भाषणाला सुरुवात केली.

त्यामुळं कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांच्या भाषणाला भरभरून दाद देत टाळ्या वाजवत फडणवीसांचं स्वागत केलं. त्यानंतर आता त्यांच्या या भाषणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीये. तर, कोणी फडणवीसांच्या कन्नड भाषणावर टीका करताना दिसत आहे.

हेही वाचा: Bageshwar Dham : 'बागेश्वर धाम'चे बाबा धीरेंद्र शास्त्री सापडले वादात, भाजप नेत्यानं का केलं त्यांचं समर्थन?

चिक्कमंगलुरूमधील सांस्कृतिक महोत्सवात बोलताना फडणवीस म्हणाले की, जेव्हा मला या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं, त्यावेळी मी लगेच स्वीकारलं. माझे बंधू सीटी रवी यांच्या प्रेमामुळंही मला चिक्कमंगलुरूमध्ये यावं लागलं. ते जे काही करतात ते मोठंच असतं. त्यामुळं मला या ठिकाणी येऊन मोठा महोत्सव पाहायला मिळणार याची खात्री होती, त्यामुळंच मी कार्यक्रमाला होकार दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा: चमत्कारानं जोशीमठचं भूस्खलन थांबवून दाखवा, मग आम्हीही नमस्कार करू; शंकराचार्यांचं थेट चॅलेंज

'महाराष्ट्र-कर्नाटकचे फार जुने मैत्रीपूर्ण संबंध'

महाराष्ट्र-कर्नाटकचे फार जुने मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत. मराठीसह कन्नड भाषाही प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. दोन्ही भाषेतील साहित्य हे लोकांना दिशा देणारं आहे. आजपर्यंत मी देशातील अनेक शहरांमध्ये गेलेलो आहे. परंतु, चिक्कमंगलुरू इतकं सुंदर आणि स्वच्छ शहर मी कुठंही पाहिलेलं नाही. चिक्कमंगलुरूमध्ये दाखल झाल्यानंतर शहरातील स्वच्छता पाहून मी भारावून गेलो, असं म्हणत फडणवीसांनी चिक्कमंगलुरू महापालिकेचं (Chikkamagaluru Municipal Corporation) कौतुक केलं.