
म्हैसूर : पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली दीड वर्षापासून तुरुंगात असलेल्या सुरेशला मोठा दिलासा मिळाला आहे. ज्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी शिक्षा मागितली, तीच पत्नी नुकतीच म्हैसूर न्यायालयात जिवंत हजर झाली. या धक्कादायक प्रकारामुळे न्यायालयाने तपास करणाऱ्या पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त करत संपूर्ण प्रकरणाचा तपास नव्याने करण्याचे आदेश दिले आहेत.