PAN-Aadhaar Linking : पॅनकार्ड आधारला लिंक केलं नाही? केंद्र सरकारने दूर केली काळजी

या मुदतीनंतर मात्र तुम्ही हे लिंक केलं नाही, तर तुमचं पॅनकार्ड निष्क्रिय होईल.
Aadhaar-Pan Linking
Aadhaar-Pan Linkingesakal

केंद्र सरकारने पॅनकार्ड आधार कार्डसोबत लिंक करण्याची अंतिम मुदत आता वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने याबद्दल निवेदन जारी करून याबद्दलची माहिती दिली आहे.

अजून तुम्ही जर पॅन-आधार लिंक केलं नसेल, तर त्यासाठी तुम्हाला ३० जून २०२३ पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. या तीन महिन्यांत तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करता येणार आहे. करचोरीला आळा घालण्यासाठी पॅन-आधार लिंकिंग आवश्यक असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

Aadhaar-Pan Linking
Pan Card News : 13 कोटी लोकांना मोठा धक्का! पॅन कार्ड धारकांसाठी सरकारने जारी केली अधिसूचना

या मुदतीनंतर मात्र तुम्ही हे लिंक केलं नाही, तर तुमचं पॅनकार्ड निष्क्रिय होईल. याआधी पॅन-आधार लिंकिंगची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. मात्र आता तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com