esakal | ‘त्या‘ गर्भवती हत्तींणीच्या मृत्यूने सोशल मीडियावर हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

elepahnt keral.jpeg

हत्तीणीच्या मृत्युनंतर सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ही हत्तीन खाण्याच्या शोधात फिरत असताना काही लोकांनी तिला फटाके भरलेले अननस खायला दिले. तिनेही विश्वासाने खाल्ले पण फटाक्यांच्या स्फोटांमध्ये तिच्या जिभेला आणि जबड्याला जबर दुखापत झाली, तरी कोणाला त्रास न देता ती तिथून निघून गेली. आणि शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. तिचा तिथे मृत्यू झाला. पोस्टमार्टम केल्यावर ती गरोदर असल्याचे समजले.

‘त्या‘ गर्भवती हत्तींणीच्या मृत्यूने सोशल मीडियावर हळहळ

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातल्या मन्नारकड भागात एक हत्तीण आपल्यासोबत वाढत असलेल्या चिमुकल्या जीवासाठी अन्नाच्या शोधात जंगलातून बाहेर पडत होती. अन्नाच्या शोधात ती चालत माणसांच्या वस्तीमध्ये आली. स्वतः साठी नाही पण पोटातील बाळासाठी न थकता माणसांवर विश्वास ठेवून त्यांच्यापर्यंत पोहोचली. पण माणसाने तिचा विश्वासघात केला. फटाक्यांनी भरलेलं अननस खायला घातल्यानं केरळमध्ये गर्भवती हत्तींणींचा मृत्यू झाला. या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहेत. अनेकांनी व्हॉट्‌सअपला त्याचे स्टेट्‌स ठेवले आहेत. सोशल मीडियावर तीभ्र भावना व्यक्त केल्या जात आहेत.
आयपीएस डी.रुपा यांनी हत्तीणीच्या दोषीस शिक्षा झाली पाहिजे, असे ट्विट केले आहे. हत्तीणीच्या मृत्युनंतर सोशल मीडियावर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. ही हत्तीन खाण्याच्या शोधात फिरत असताना काही लोकांनी तिला फटाके भरलेले अननस खायला दिले. तिनेही विश्वासाने खाल्ले पण फटाक्यांच्या स्फोटांमध्ये तिच्या जिभेला आणि जबड्याला जबर दुखापत झाली, तरी कोणाला त्रास न देता ती तिथून निघून गेली. आणि शेवटी तिला नदी दिसल्यावर नदीच्या मधोमध जाऊन ती शांत उभी राहिली. तिचा तिथे मृत्यू झाला. पोस्टमार्टम केल्यावर ती गरोदर असल्याचे समजले.
काही महिन्यांपासून करोना व्हायरस, दोन दिवसांपासून निसर्ग चक्रीवादळ तेवढ्यात नदीच्या पाण्यात निश्चल उभा राहिलेल्या हिरकणी हत्तीणींने मृत्यूशी झुंज देत सोडलेला श्वास‌. एकामाघोमाघ सुरू असलेलं हे युद्ध संपणार तर कधी. हत्तीच्या मृत्याची बातमी सर्वत्र पसरली आणि संताप व्यक्त केला जाऊ लागला.
केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील वेल्लीयार नदीत उभा राहिलेल्या गर्भवती हत्तीणीचा तो फोटो आहे. २७ मे २०२० ला केरळ राज्याच्या एका फॉरेस्ट ऑफिसर ने मोहन कृष्णन ने 'माफ कर बहिणी' म्हणून एक पोस्ट त्याबद्दल शेअर केली. हत्ती हा बालगोपाळांचा विशेष आवडता प्राणी. हत्ती हा एक विशाल प्राणी आहे. लांबसडक सोंड, खांबासारखे पाय, सुपासारखे कान, छोटे डोळे आणि टोकदार सुळे अशी तिची रचना. कधी ओवीत, कधी अभंगात, कधी पुराणांमध्ये तर कधी हत्तीच्या गोष्टींमध्ये ही त्याची माहिती नेहमीच पुढे येत असते. हत्तीण २२ महिन्यांपर्यंत गर्भवती राहते. एका वेळेस तिला एकच पिल्लू होतं किंवा दोन देखील होतात. हत्तींना पाण्यात डुबायला फार आवडतं. आपण अनेकदा पाहतो हत्ती कित्येकदा सोंडेत पाणी घेऊन एकमेकांवर पाणी फवारण्याचा खेळ खेळतात, पण तिचा अखेरचा श्वासच पाण्यात जाईल असे ती कधी कल्पनाही केली नसेल. अशी डोळ्यात पाणी आणणारी घटना घडली. निसर्गासाठी छोट्या मुंगी पासून ते अजस्त्र हत्तीपर्यंत, छोट्या पक्षापासून ते माणसापर्यंत सगळे प्रिय असतात. सृष्टी हीच शक्ती आणि सगळी तिची लेकरे तिच्यासाठी समान. कुठलाही प्राणी मादीच्या इच्छेशिवाय तिचा उपभोग घेत नाही, कुठलाही प्राणी भूक नसताना दुसऱ्या प्राण्यावर हल्ला करत नाही. नदीच्या मधोमध निश्चल उभी राहिलेल्या हत्तीचा फोटो सोशल मीडियावर फिरतोय. त्या फोटोबाबतची कहाणी अत्यंत करूण आहे.