जल्लाद फाशी देण्यापूर्वी कैद्याच्या कानात म्हणतो की...

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

फाशी देण्यापूर्वी कैद्याला अंघोळ घातली जाते आणि नवीन कपडे घालायला दिले जातात. फाशीच्या ठिकाणी कैद्याला आणले जाते आणि काळा कपडा चेहऱयावर टाकून दोरखंड लावला जातो. फाशी देण्याआधी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते.

नवी दिल्ली: 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी लवकरच होणार असल्याचे दिसत आहे. बिहारमधील बक्‍सर कारागृहाला या आठवड्याअखेरिस फाशी देण्याचा दोर तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या तिहार तुरुंगातील आरोपींना फाशी देण्यासाठी जल्लादच उपलब्ध नसल्याने त्याच्या शोधासाठी प्रशासनाकडून शोधाशोध सुरू आहे. यामुळे जल्लाद चर्चेत आला आहे.

तिहार तुरुंगातील अधिकाऱ्यांनी त्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी देशातील इतर तुरुंगांशी संपर्क साधला आहे. निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुकेश, पवन, विनय आणि अक्षय या आरोपींना 12 डिसेंबर 2018 ला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 'निर्भया' प्रकरणात दोषींना दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची सुनावणी लवकरच होणार आहे. बिहारमधील बक्‍सर कारागृहाला या आठवड्याअखेरिस फाशी देण्याचा दोर तयार करण्याचा आदेश देण्यात आला आहे. काही प्रसारमाध्यमांच्या अंदाजानुसार या महिनाअखेरिस शिक्षेची अमलबजावणी होणार आहे. निर्भयावर 16 डिसेंबरला दिल्लीत सामुहिक बलात्कार झाला होता, त्यादिवशीच तिला न्याय मिळण्याची शक्यता आहे.

'फाशीचा दोर तयार करणारे बक्‍सर कारागृह हे राज्यातील एकमेव आहे. या तुरुंगाला दोर तयार करण्याचा आदेश गेल्या आठवड्यात देण्यात आला आहे. बक्‍सर तुरुंगात फार पूर्वीपासून फाशीचे दोर तयार केले जातात. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरुला फासावर लटकवण्यासाठी याच तुरुंगातून तयार केलेल्या दोराचा वापर केला होता. 2016-17 मध्ये आम्हाला त्यासाठी पतियाळा तुरुंगातून आदेश मिळाले होते. मात्र, त्याचा उद्देश तेव्हा आम्हाला माहीत नव्हता. फाशीच्या एका दोरासाठी सात हजार 200 कच्चे धागे वापरले जातात. तो तयार करण्यासाठी तीन दिवस लागतात. हे सर्व काम हाताने केले जाते. पाच-सहा कैदी यावर काम करतात. याची लड तयार करण्यासाठी यंत्राचा वापर होतो. या आधी तुरुंगात तयार केलेल्या दोराची किंमत एक हजार 725 रुपये होती. लोखंड आणि पितळ यांच्या भाव ज्याप्रमाणे असतील तसे दोराच्या किंमतीत बदल होत जातो. कैद्याच्या गळ्याभोवती दोर आवळला जाण्यासाठी या धातूंचा उपयोग होतो,' असे बक्‍सर तुरुंगाचे अधीक्षक विजयकुमार अरोरा यांनी सांगितले.

फाशीची शिक्षा अंतिम झाल्यानंतर मृत्यूचं वॉरंट थांबवता येत आहे. दया याचिका फेटाळून लावल्यानंतर हे वॉरंट कधीही येऊ शकते. फाशीची तारीख आणि वेळ वॉरंटमध्ये लिहिलेली असते. फाशीची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यासह पुढील कार्यवाही तुरूंगातील नियमावलीनुसार केली जाते. प्रत्येक राज्यात तुरूंगात स्वतःचे मॅन्युअल असते. एखाद्याला फाशी देताना विशिष्ट नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे. त्याशिवाय फाशीची प्रक्रिया अपूर्ण मानली जाते. नियमांचे पालन केल्याशिवाय फाशीची प्रक्रिया पूर्ण होत नाही. मृत्यूचं वॉरंट काढल्यानंतर तुला फाशी देण्यात येणार आहे, असे कैद्याला सांगितले जाते.

फाशीसाठी सकाळी 6, 7 किंवा 8 ही वेळ कायम असते. यामागील कारण म्हणजे, कारागृहातील इतर कैदी सकाळी झोपलेले असतात. ज्या कैद्याला फाशी द्यावी लागेल त्याला संपूर्ण दिवस थांबण्याची गरज नाही. शिवाय, त्याच्या कुटुंबालाही अंतविधी करण्यासाची संधी मिळते. कैद्याच्या कुटुंबियांना 10-15 दिवस आधी सूचना दिली जाते. कारण ते शेवटचं कैद्याला भेटू शकतील. कारागृहात कैद्याची पूर्ण तपासणी केली जाते. त्याला इतर कैद्यांपासून दुसरीकडे ठेवले जाते. फाशीच्या दिवशी सकाळी पहारेकरी अधीक्षकांच्या देखरेखीखाली कैदीला फाशीच्या खोलीत घेऊन येतात. फाशीच्या वेळी जल्लाद व्यतिरिक्त तीन अधिकारी हजर असतात. हे तीन अधिकारी तुरूंग अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि दंडाधिकारी असतात. फाशी देण्यापूर्वी अधीक्षक दंडाधिकाऱ्यास सांगतात की, 'मी कैदीची ओळख करुन घेतली आहे आणि त्याचा मृत्यूदंडही वाचला आहे. मृत्यूच्या वॉरंटवर कैदीची सही असते.'

फाशी देण्यापूर्वी कैद्याला अंघोळ घातली जाते आणि नवीन कपडे घालायला दिले जातात. फाशीच्या ठिकाणी कैद्याला आणले जाते आणि काळा कपडा चेहऱयावर टाकून दोरखंड लावला जातो. फाशी देण्याआधी कैद्याला त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. त्यामध्ये तो कुटुंबियांना शेवटचं भेटण्याची, चांगलं जेवण खाण्याची इच्छा असते. कैद्याला फाशी दिली जाते तेव्हा त्याच्या शेवटच्या वेळी फक्त जल्लादच त्याच्या सोबत असतो. फाशी देण्यापूर्वी जल्लाद कैद्याच्या कानात काहीतरी बोलतो आणि दोरखंड सोडून देतो. त्यावेळी जल्लाद कैद्याच्या कानात म्हणतो की, 'हिंदूना राम राम आणि मुस्लिमांना सलाम, मी माझ्या कामापुढे हतबल आहे. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल अशी मी प्रार्थना करतो.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death sentence hanging till death warrant process penalty jallad says