Mukesh Ambani: अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mukesh Ambani: अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

Mukesh Ambani: अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. रिलायन्स कुंटुंबाशी संबधित रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पीटल उडवून देण्याची धमकी आली होती. अनोखळी नंबर वरुन हा धमकीचा फोन आला होता. धमकीचा फोन करणाऱ्यास मुंबई पोलिसांनी बिहार पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.

बिहार दरभंगाचे एसएसपी आकाश कुमार यांनी याबद्दलची माहिती दिली, राकेश कुमार मिश्रा असे या तरुणाचे नाव असून तोही मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे दिसून आले आहे. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई मुंबई पोलिस करणार आहेत.

मुकेश अंबानी आणि कुटुंबाला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील अंबानी कुटुंबाला धमकीचे फोन आले होते. पोलिसांकडून या फोनची चौकशी सुरू आहे.

टॅग्स :policemukesh ambani