Cow Marathi News : शिरच्छेद केलेल्या सात गायींचे मृतदेह सापडले; वाद निर्माण करण्याचा प्रयत्न? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cow Marathi News

शिरच्छेद केलेल्या सात गायींचे मृतदेह सापडले; वाद निर्माण करण्याचा प्रयत्न?

भरतपूर : राजस्थानमधील भरतपूर येथील पहाडी पोलिस स्टेशन परिसरात सात गायींचे (cow) शव सापडल्याची घटना समोर आली आहे. नागल क्रशर झोनजवळील निर्जन भागाच्या बाजूला सात गायींचे शिरच्छेद केलेले मृतदेह (decapitated cows) पाहून लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अशाप्रकारे गायींचे शव मिळाल्यानंतर हा पर्यावरण बिघडवण्याचा डाव तर नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गायींच्या (cow) शवांचे शवविच्छेदन केले आणि अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. गायींच्या मृतदेहांची स्थिती पाहता हे गोहत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: अशोकस्तंभाचा वाद : मूळ चिन्ह बनवणारे डिझायनर प्राणिसंग्रहालयात का गेले?

राजस्थानच्या (Rajasthan) उदयपूर जिल्ह्यात कन्हैयालालच्या हत्येपासून आतापर्यंत अशाप्रकारचे अनेक प्रक्षोभक विधानांचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, येथील प्रशासन पूर्णत: सज्ज आहे. अशा कोणत्याही कृत्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

Web Title: Decapitated Cows Rajasthan Bharatpur Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RajasthanCrime NewsCow
go to top