काँग्रेस उमेदवार मोन्सेरात अडचणीत, बलात्कार प्रकरणी 3 जूनला निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मे 2019

पणजी : पणजी पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार अतानासिओ ऊर्फ बाबुश माेन्सेरात व एका महिलेविरुद्ध बलात्कारा्च्या आरोपाखाली सत्र न्यायालयात  सीआयडीच्या महिला पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपपत्र सादर केले होते. न्यायालयात आज  आरोपपत्रावर आरोपनिश्चितीचा युक्तिवाद होऊन त्यावरील निर्णय येत्या 3 जूनला ठेवण्यात आला आहे. 

हे आरोपपत्र आज आरोप निश्चितीसाठी न्यायालयासमोर युक्तिवादसाठी आले असता संशयित मोन्सेरात यांच्या वकिलांनी हे आरोपपत्र राजकीयप्रेरित असल्याचा दावा केला. पीडित मुलीने सहावेळा जबानी बदली असल्याने त्यावर विश्वास ठेवला जाऊ नये व आरोपपत्रावरील सुनावणी बंद करण्याची विनंती केली. पीडित मुलीने या घटनेची स्वतःहून माहिती दिली आहे त्यामुळे आरोपनिश्चितीवेळी हे प्रकरण बंद करणे योग्य नसल्याची बाजू सरकारी वकील रॉय यांनी मांडली. 

माजी मंत्री बाबुश मोन्सेरात याच्याविरुद्ध 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 2016 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. त्याला व मध्यस्थी असलेली महिला हिला पोलिसांनी अटक केली होती. पीडित मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असल्याने  दोघांना पोक्सो या कायद्याखाली गु्न्हा नोंद केला होता. 250 आरोपपत्रात 40 साक्षीदार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: decision on 3 june of rape case on Congress candidate Monserat