देशातील नक्षल हिंसाचारात घट - जी. किशन रेड्डी

पीटीआय
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

नक्षलवादी गटांना रोखण्यासाठी राष्ट्रीय धोरण
विविध प्रकारच्या नक्षलवादी गटांना (एलडब्ल्यूई) रोखण्यासाठी भारत सरकारने २०१५ मध्ये एक राष्ट्रीय धोरण आणि कृती योजना तयार केली आहे. त्यात सुरक्षा, विकास आणि स्थानिक समुदायाचे हक्क आदी मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आणि त्यानुसार योजना राबविण्यात येत आहे, असे रेड्डी म्हणाले.

नवी दिल्ली - देशातील विविध राज्यांतील विशेषत: नक्षलग्रस्त भागातील हिंसाचारात तीन वर्षात घट झाल्याची माहिती आज संसदेत देण्यात आली. गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत लेखी प्रश्‍नोत्तराच्या तासात नक्षल हिंसाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशात नक्षल हिंसाचाराच्या २०१७ रोजी ९०८, २०१८ रोजी ८३३ आणि २०१९ रोजी ६७० घटना घडल्याचे रेड्डी यांनी सांगितले. त्याचवेळी नक्षलग्रगस्त राज्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याचे ते म्हणाले. २०१७ रोजी १८८, २०१८ रोजी १७३ आणि २०१९ रोजी १५० नागरिकांचा नक्षलवादी हल्ल्यात आणि हिंसाचारात मृत्यू झाला आहे.

२०१७ रोजी ७५ जवान हुतात्मा झाले, तर २०१८ रोजी ६७ आणि २०१९ मध्ये ५२ जवानांना प्राणास मुकावे लागले. तसेच विविध राज्यांत २०१७ रोजी १३६ नक्षलवादी मारले गेले. २०१८ मध्ये २२५ आणि गेल्या वर्षी १४५ नक्षलवादी ठार झाले. २०१७ रोजी १८८८ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. २०१८ रोजी १९३३ तर २०१९ रोजी १२७६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decline in Naxal violence in the country g kishan reddy