Deepak Dalvi death news Belagavi
esakal
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी (वय ८४) यांचे मंगळवारी (ता. १७) आजाराने (Maharashtra Ekikaran Samiti Leader Deepak Dalvi Passes Away in Belagavi) निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.
सीमालढ्यात सुरुवातीपासून असणाऱ्या दळवी यांनी काही वर्षांपूर्वी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा घेतली होती. तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी करण्यात आलेल्या अनेक आंदोलनांचे त्यांनी नेतृत्व केले होते. यासह मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ते अनेक वर्षे कार्यरत होते.