Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेल्यांचा पराभव

पंजाबमधील पतियाळा येथील काँग्रेसच्या खासदार परनीत कौर सिंग या सुद्धा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024 Sakal

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश केलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारले असून त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या रवनीत सिंग बिट्टू हे लुधियानाचे काँग्रेसचे खासदार होते.

परंतु ते निवडणुकीपूर्वी भाजपत गेले व उमेदवारी मिळविली. राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून बिट्टू यांची ओळख होती. परंतु मतदारांनी त्यांना स्वीकारले नसून त्यांना काँग्रेसचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी पराभूत केले.

पंजाबमधील पतियाळा येथील काँग्रेसच्या खासदार परनीत कौर सिंग या सुद्धा निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला. त्यांना भाजपने पतियाळामधून उमेदवारी दिली. परंतु त्यांचा काँग्रेसचे उमेदवार व पतियाळातील डॉ. धर्मवीर गांधी यांनी पराभव केला.

पंजाबमधील जालंधरचे आपचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. परंतु त्यांनाही भाजपचे उमेदवार म्हणून पराभव स्वीकारावा लागला. माजी मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी त्यांचा पराभव केला.

बहुजन समाज पक्षाचे उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर मतदारसंघाचे खासदार रितेश पांडे यांनी निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला. त्यांना भाजपने उमेदवारी दिली. परंतु त्यांचा सपचे नेते लालजी वर्मा यांनी पराभव केला.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे अमरावती येथून निवडून आलेल्या अपक्ष नवनीत राणा यांनी निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला होता. त्यांचा पराभव काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी केला. त्यांचे पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचे स्वप्न भंग पावले.

त्याचप्रमाणे काँग्रेस, आप असा प्रवेश करून भाजपात दाखल झालेले अशोक तंवर यांचा हरियानातील सिरसा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. त्यांचा पराभव काँग्रेसच्या नेत्या शैलजाकुमारी यांनी पराभव केला.

राजस्थानमधील नागौरमध्ये भाजपच्या उमेदवार ज्योती मिर्धा यांचाही पराभव झाला. त्या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमधून भाजपत दाखल झाल्या होत्या. त्यांचा राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे हनुमान बेनीवाल यांनी पराभव केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com