उत्तराखंडच्या आजींबाईंची कमाल, राहुल गांधीच्या नावावर केली संपत्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul-Gandhi-Congress

उत्तराखंडच्या आजींबाईंची कमाल, राहुल गांधीच्या नावावर केली संपत्ती

डेहरादून : उत्तराखंडमधील एका 78 वर्षीय आज्जींनी आपली सर्व संपत्ती काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना देऊ केली आहे. यामध्ये 50 लाखांची मालमत्ता तसेच 10 तोळे सोन्याचा समावेश असून, राहुल गांधी आणि त्यांचे विचार देशासाठी आवश्यक असल्याचे मतही या आज्जींनी व्यक्त केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभेच्या निवडुकांमध्ये काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (Dehradun Women Give His Property To Rahul Gandhi)

हेही वाचा: प्रवासासाठी बूस्टर डोस आवश्यक, केंद्रानं धोरण ठरवावं : पुनावाला

डेहराडून येथील रहिवासी असलेल्या 78 वर्षीय महिला पुष्पा मुंजियाल (Pushapa Munjiyal)P यांनी राहुल गांधींना आपल्या सर्व संपत्तीचे मालक बनवले असून, यासाठी त्यांनी डेहराडून कोर्टात राहुल गांधी यांच्या नावे मालकी हक्काचे वारसापत्र सादर केले आहे. राहुल गांधी यांच्या विचारांचा आपल्यावर खूप प्रभाव असून, त्याचाच एक भाग म्हणून आपण आपली सर्व संपत्ती राहुल गांधींच्या नावावर देत असल्याचे मुंजियाल यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: HDFC लि. अन् HDFC च्या विलीनीकरणाचा ग्राहकांना काय होणार फायदा

मुंजिलाल यांनी राहुल गांधी यांच्या नावावर केलेले वारसापत्र माजी प्रदेशाध्यक्ष प्रीतम सिंह यांना त्यांच्या निवासस्थानी दिले आहे, असे काँग्रेसचे महानगर अध्यक्ष लालचंद शर्मा यांनी सांगितले. मुंजियाल यांच्या संपत्तीमध्ये 50 लाखांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आणि 10 तोळे सोन्याचाही समावेश आहे.

Web Title: Dehradun Old Woman Give Her All Property To Rahul Gandhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top