AIIMS Server Attack : दिल्ली एम्स सायबर हल्ल्याबाबत गृहमंत्रालयाकडून महत्त्वाची अपडेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

delhi aiims server attack fir details that the attack originated from china

AIIMS Server Attack : दिल्ली एम्स सायबर हल्ल्याबाबत गृहमंत्रालयाकडून महत्त्वाची अपडेट

Delhi AIIMS Server Attack : दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सायबर हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा सायबर हल्ला चीनमधून झाल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयाच्या 100 सर्व्हरपैकी 40 फिजिकल हॅक करण्यात आले आणि 60 सर्व्हर व्हर्चुअली हॅक करण्यात आले. यापैकी पाच सर्व्हरचा डेटा हॅकर्सकडून यशस्वीपणे परत मिळवण्यात आला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (MoHFW) बुधवारी (14 डिसेंबर) ही माहिती दिली.

25 नोव्हेंबर रोजी, दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिटद्वारे खंडणी आणि सायबर दहशतवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) आता टार्गेट रॅन्समवेअर हल्ल्याची चौकशी करत आहे. NIA सोबतच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि दिल्ली सायबर क्राइम सेल, इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन, इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (CBI) देखील सायबर हल्ल्याचा तपास करत आहेत.

हेही वाचा - संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Ajit Pawar : शरद पवारांना जीवे मारण्याच्या धमकीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

एम्सवर सायबर हल्ला

एम्स दिल्ली (Delhi AIIMS)ने पहिल्यांदा 23 नोव्हेंबर रोजी आपल्या सर्व्हरमध्ये खराबी असल्याचे सांगितले होते. सर्व्हरची देखभालीकरिता नेमणूक केलेल्या दोन विश्लेषकांना सायबर सुरक्षा उल्लंघनाच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ई-हॉस्पिटल डेटा परत मिळवण्यात आला आहे. सेवा पुन्हा सुरू करण्यापूर्वी नेटवर्क क्लीन केले जात आहे. रुग्णालयातील सेवांसाठी डेटाचा आकार आणि मोठ्या संख्येने सर्व्हर/कंप्युटर्सची संख्या खूप जास्त असल्याने या प्रक्रियेला थोडा वेळ लागत आहे. सायबर सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात आहेत.

हेही वाचा: 5G on iPhones : आयफोन्सच्या 'या' मॉडेल्समध्ये मिळतोय 5G सपोर्ट, कसं कराल ॲक्टिवेट? वाचा

या महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने एम्स दिल्ली येथील संगणक प्रणालीवर झालेल्या हल्ल्याची चौकशी सुरू केली होती. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल फॉरेन्सिक लॅब (CFSL) च्या टीमला मालवेअर हल्ल्याचा स्रोत ओळखण्यासाठी AIIMS दिल्लीच्या सर्व्हरची तपासणी करण्याचे काम देण्यात आले आहे.

टॅग्स :delhi