शाळा-कॉलेज पुढच्या आदेशापर्यंत बंद; दिल्ली हवा प्रदुषणाने 'लॉक' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

new delhi air pollution

पुढचा आदेश येईपर्यंत सर्व शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश कमिशन फॉर एअर क्वालिटी मॉनिटरिंगने दिले आहे.

शाळा-कॉलेज पुढच्या आदेशापर्यंत बंद; दिल्ली हवा प्रदुषणाने 'लॉक'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिल्लीत प्रदुषणाची पातळी खूपच वाढली असून हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस अधिक खराब होत चालली आहे. यामुळे आता दिल्ली एनसीआरमध्ये पुढचा आदेश येईपर्यंत सर्व शाळा, कॉलेज आणि शिक्षण संस्था बंद ठेवण्याचे आदेश कमिशन फॉर एअर क्वालिटी मॉनिटरिंगने दिले आहे. तसंच बांधकाम आणि वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घातली आहे. हे आदेश २१ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. तर शाळा-कॉलेज मात्र पुढच्या आदेशापर्यंत बंदच राहतील. निर्बंध घातल्याने हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होते का याचा आढावा घेऊन २२ नोव्हेंबरला अहवाल देण्याचे आदेशही राज्यांना देण्यात आले आहेत.

गेल्या दोन आठवड्यात दिल्लीची हवा विषारी बनत गेली आहे. दिल्लीसह पंजाब आणि हरयाणा या राज्यांतही धान जाळल्याने हवा प्रदुषणात वाढ झाली. त्यानतंर सुप्रीम कोर्टाने प्रदुषण नियंत्रणात आणण्याासाठी कमिशन आणि राज्यांना बैठक घेण्याचे आदेश दिले होते. मंगळवारी दिल्ली, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड सरकारची केंद्रीय प्रदुषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. यावेळी कमिटीने दिलेल्या आदेशाची प्रत सर्वोच्च न्यायालायत सादर करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी आहे.

हेही वाचा: सरकारला जबाबदारी टाळता येत नाही : केरळ उच्च न्यायालय

दिल्लीत काय आहेत निर्बंध

- २१ नोव्हेंबरपर्यंत दिल्ली एनसीआरमध्ये ५० टक्के स्टाफला वर्क फ्रॉम होम मोडवर काम करण्याचा सल्ला. फक्त सरकारीच नाही तर खासगी कार्यालयांमध्येही लागू.

- गाड्यांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी दिल्लीतील सर्व ट्रकना प्रवेशावर २१ नोव्हेंबरपर्यंत बंदी. फक्त अत्यावश्यक वस्तू, साहित्य घेऊन जाणाऱ्यां ट्रकना सूट. डिझेलवर चालणारी १० वर्षे जुनी आणि पेट्रोलवर चालणारी १५ वर्षे जुनी वाहने चालवण्यास परवानगी नाही.

- बांधकामाची कामेही २१ नोव्हेंबरपर्यंत करता येणार नाहीत. तर रेल्वे, मेट्रो, एअरपोर्ट, इंटर स्टेट बस इत्यादीचे बांधकाम सुरु राहील.

- दिल्लीत ३०० किमी परीघात ११ थर्मल पॉवर प्लांटमधील फक्त ५ सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. इतर सर्व पॉवर प्लांट हे ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील.

loading image
go to top