दरभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन; विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर

बुधवार, दि. २४ जानेवारी स्पाईसजेटच्या आरक्षण कार्यालयात एक फोन आला. त्यामध्ये दरंभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात (एसजी ८४९६) बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली.
दरभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन; विमानतळ प्रशासन अलर्ट मोडवर

नवी दिल्लीः दरभंगा ते दिल्ली विमानामध्ये बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन बुधवारी विमानतळ प्रशासनाला आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दिल्ली विमानतळ प्रशासनाने परिस्थितीत विनासायास हाताळली आहे.

बुधवार, दि. २४ जानेवारी स्पाईसजेटच्या आरक्षण कार्यालयात एक फोन आला. त्यामध्ये दरंभंगाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानात (एसजी ८४९६) बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली. दिल्ली विमानतळ प्रशासनाने तातडीने हालचाली करत सर्व सुरक्षा यंत्रणा तैनात ठेवल्या. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दिल्ली विमानतळावर हे विमान सुरक्षितपणे उतरले.

सुरुवातीला या विमानाचं दूर लँडिंग करण्यात आलं. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्यानंतर या विमानाची तपासणी केली जात असल्याचं स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने 'एएनआय'ला सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com