
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक विमान प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या पहिल्या दहा विमानतळांच्या यादीत नवव्या स्थानावर दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाने स्थान मिळवले आहे. अटलांटाचे हार्टसफील्ड-जॅक्सन विमानतळ पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसऱ्या, तर डल्लास विमानतळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. एअरपोर्टस काउन्सिल इंटरनॅशनलने (एसीआय) ही माहिती दिली आहे.