Delhi Assembly Election : विधानसभेची अधिसूचना जारी; अर्जाच्या प्रक्रियेस सुरवात
Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी औपचारिक अधिसूचना जारी करण्यात आली असून, ७० विधानसभा जागांसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अधिसूचनेवर दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी सही केली.
नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी औपचारिक अधिसूचना आज प्रसिद्ध झाली आहे. यासोबतच विधानसभेच्या ७० जागांसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी ही अधिसूचना जारी केली.