
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने(आप) घोषणापत्र जाहीर केले असून, दिल्लीकरांना १५ गॅरंटी दिल्या आहेत. नव्या आश्वासनांमध्ये महिलांना दरमहा २१०० रुपयांची आर्थिक मदत तसेच ज्येष्ठ नागरिकांना संजीवनी योजनेअंतर्गत मोफत उपचाराची हमी देण्यात आली आहे.