
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा वेगवान कारच्या धडकेने हादरविणारी घटना घडली आहे. वसंत विहार परिसरातील शिवा कॅम्पजवळ ९ जुलैच्या रात्री १:४५ वाजण्याच्या सुमारास एका नशेत धुत ऑडी कार चालकाने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना बेदरकारपणे चिरडले. या भयानक अपघाताने परिसरात दहशत पसरली असून, फूटपाथवर राहणाऱ्या लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.