G-20 Summit: 'दिल्ली बनेगा खलिस्तान'; पाच मेट्रो स्टेशनच्या भितींवर लिहिल्या भारत विरोधी घोषणा

delhi
delhiesakal

नवी दिल्ली- भारतात पुढील महिन्यात ९ ते १० सप्टेंबरला जी-२० संमेलनाचे आयोजन होणार आहे. त्याआधी राजधानी दिल्लीमध्ये वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात कडक सुरक्षा व्यवस्था असताना दिल्लीच्या अनेक मेट्रो स्टेशच्या भिंतींवर काळ्या रंगात भारत विरोधी आणि खलिस्तानच्या समर्थनात घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Delhi Banega Khalistan Slogans Appear On Walls Of 5 Metro Stations Ahead Of G20 Summit)

दिल्ली पोलिसांनी रविवारी यासंदर्भातील माहिती दिली. दिल्लीच्या पाच मेट्रो स्टेशनवर काहींनी 'दिल्ली खलिस्तान होईल' आणि 'खलिस्तान जिंदाबाद' असा आशयाच्या घोषणा लिहिल्या होत्या. दिल्ली पोलिसांनी याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे. दाव्यानुसार, या प्रकारामागे बंदी घालण्यात आलेली संघटना शीख फॉर जस्टिस (एसएफजे) हिचा हात आहे.

delhi
Delhi: दिल्ली विमानतळावर घोडचूक; 2 विमानांना लँडिंग आणि टेकऑफची एकाच वेळी परवानगी, अन्...

दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, जी-२० संमेलनाच्या आधी शीख फॉर जस्टिसने (SFJ) दिल्ली मेट्रो स्टेशनांवरील रॉ फुटेज जारी केलाय. मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर खलिस्तानच्या समर्थनात घोषणा देण्यात आले आहेत. फुटेजमध्ये दिल्लीतील मेट्रो स्टेशन शिवाजी पार्क ते पंजाबी बाग पर्यंत एसएफजे कार्यकर्ते खलिस्तान समर्थनार्थ घोषणा देताना दिसत आहेत.

delhi
Divorce Case: पतीवर खोटे आरोप करणे अन् सतत पोलिसांची धमकी देणे क्रूरता; दिल्ली हायकोर्टाचे निरीक्षण

अमेरिका, कॅनाडा आणि ब्रिटेनमध्ये राहणारे काही कट्टरपंथी शीख ही संघटना चालवतात. या संघटनेवर २०१९ मध्ये बेयादेशीर कृत्य प्रतिबंध कायद्यांतर्गत बंदी घातली होती. विशेष म्हणजे असा पहिला प्रसंग नाही. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील विकासपुरी, जनकपुरी, पश्चिम विहार आणि पीरागढी भागातील काही भींतीवर खलिस्तान समर्थनात घोषणा लिहिण्यात आल्या होत्या. पोलिसांनी याप्रकरणात दोन व्यक्तींना अटक केली होती.

delhi
Jalgaon News : महामार्ग ‘अपग्रेडेशन’चा दिल्ली दरबारी पाठपुरावा : जिल्‍हाधिकारी प्रसाद

दरम्यान, दिल्लीमध्ये जी-२० संमेलनाचे आयोजन केले जात आहे. यानिमित्ताने जोरदार तयारी सुरु आहे. या संमेलनासाठी यूरोपीय संघ आणि आमंत्रित ३० देशाचे अध्यक्ष आणि इतर महत्त्वाचे नेते येणार आहेत. १४ आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख देखील कार्यक्रमाला येण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com