सिमल्यापेक्षा थंडगार पडली दिल्ली! तापमान दीड अंशावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cold in delhi

Delhi Cold : सिमल्यापेक्षा थंडगार पडली दिल्ली! तापमान दीड अंशावर

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीचे तापमान कालपासून आणखी घसरले. ब्रिटीशांची हिवाळ्यातील राजधानी सिमल्यापेक्षा (२.२) दिल्लीचे तापमान काल रात्री व आज पहाटे नोंदविले गेले. मध्यरात्रीनंतर पारा दीड अंशाच्या आसपास पोहोचला आणि दिल्लीकर आणखीनच गारठून गेले. थंडी आणि प्रदूषणाचा विळखा बसलेल्या या हवेत श्वसनरोग व ह्रुदयाचे विकार असलेल्या रूग्णांबरोबरच ज्येष्ठ नागरिक व मुलांची विशेष काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

दिल्लीच्या रिज भागात रात्रीचे तापमान दीड अंशावर पोहोचले. सफदरजंग वेधशाळेने २.२ तर आयानगर भागात ३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिल्लीत यंदा विक्रमी थंडी पडल्याचे सांगितले जाते. काही भागांत पाण्याचा बर्फ झाला आहे.

डॉक्टरांनी सध्याच्या थंडीपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे.डॉक्टरांच्या मते अशा हवामानात आजारी व्यक्तींशिवाय वृद्ध आणि लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. खाण्यापासून ते २४ तास कानटोप्या व उबदार कपड्यांपर्यंत अनेक प्रकारची खबरदारी घेणे आवश्यक ठरले आहे.

रोजीरोटीची लढाई करणाऱया गरीबांसाठीही दिल्लीतील यंदाची थंडी त्रासदायक ठरली आहे. रूग्णालये व रस्त्यांवर थंडीत उघड्यावर कुडकुडणाऱया हजारो लोकांनी शएकोट्या पेटवून व पथारी पसरून थंडीपासून संरक्षण करण्याचा केविलवाणा प्रय्तन सुरू ठएवला आहे. राज्य सरकारने गरीबांसाठी जी निवारागृहे (रैन बसेरा) उभारली आहेत तेथे जन्माला आलेल्या ‘दादा‘ मंडळींकडून किमान डोके टेकायला तरी जाग मिळण्यासाठी ‘आर्थीक व्यवहार' तेजीत आहेत.

हवाही खराब

राजधानीतील वायु गुणवत्ता निर्देशांकही (एक्यूआय) गंभीर श्रेणी पोहोचला आहे आणि कर्करोगास कारणीभूत प्रदूषकांचे प्रमाणही धओकादायक स्तरावर पोहोचले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने निर्धारित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जवळजवळ १०० पट जास्त प्रदूषण (पीएम २.५) सध्या दिल्लीत आहे.आहे. या सूक्ष्म प्रदूषकाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास फुफ्फुसाचा कर्करोग देखील होऊ शकतो.

प्रदूषणाची पातळी पुन्हा वाढल्याने एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशनच्या ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन च्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषणात सुधारणा झाल्यानंतर श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेचा तिसरा टप्पा मागे घेण्यात आला. केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण समितीने४ जानेवारीच्या आदेशात भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या अंदाजाचा हवाला देऊन कठोर निर्बंध शिथिल केले होते. मात्र दोनच दिवसांत प्रदूषण पुन्हा धओकादायक पातळीवर पचले आहे. रस्त्यांवर धूर सोडत धावणारी लाखो वाहने व काही उद्योगांचा वाटा प्रदूषण वाढविण्यात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

टॅग्स :delhiColdWinter