Delhi Crime News: दिल्लीतील मंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या हत्येचा उलगडा, दाऊद टोळीतील गुंडाचा एनकाउंटर

Delhi Crime Case : दिल्लीतील कायदा मंत्र्यांच्या कॅम्प कार्यालयाबाहेर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी शोध सुरू असलेला नसीम दुर्राणी बुलंदशहरमध्ये पोलीस चकमकीत ठार झाला. त्याच्यावर २६ हून अधिक गुन्हे दाखल होते.
Police personnel at the encounter site in Bulandshahr, Uttar Pradesh, following the operation against gangster Naseem Durrani.

Police personnel at the encounter site in Bulandshahr, Uttar Pradesh, following the operation against gangster Naseem Durrani.

esakal

Updated on: 

दिल्ली :

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या गुन्हेगारी नेटवर्कशी संबंधित कुख्यात गुंड नसीम दुर्राणी शुक्रवारी (२० नोव्हेंबर) उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे पोलीस चकमकीत ठार झाला. दिल्ली पोलीस आणि नोएडा विशेष कृती दलाच्या (एसटीएफ) संयुक्त पथकाने ही कारवाई केली. त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. दिल्लीतील एका हत्या प्रकरणात त्याचा शोध सुरू होता.

Loading content, please wait...