Delhi Crime News : दिल्लीत क्रूरतेचा कळस! कॅब चालकाला लुटलं, कारसोबत फरफटत नेलं; भयानक व्हिडिओ होतोय व्हायरल

Delhi crime news cab driver robbed killed arfter dragged on road Video Surfaces
Delhi crime news cab driver robbed killed arfter dragged on road Video Surfaces

दिल्लीच्या वसंत कुजं नॉर्थ भागातून एक भयावह घटना समोर आली आहे. येथे एका कॅब चालकास तब्बल २०० मीटर अंतरापर्यंत फरपटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ही घटनेबद्दल काल रात्री पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांना कॅब ड्रायव्हर रस्त्यावर गंभीर अवस्थेत आढळून आला.

पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी हे कॅब चालकाला लुटत होते, यावेळी टॅक्सीच्या मालकाने विरोध केल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर त्याला कारसोबत जवळपास २०० मीटर फरफटत नेण्यात आलं. याप्रकरणात दिल्ली पोलिसांनी ३०२ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र अद्याप आरोपी फरार आहेत.

Delhi crime news cab driver robbed killed arfter dragged on road Video Surfaces
Israel June War : एकाच वेळी 8 मुस्लिम राष्ट्रांनी केला हल्ला, तरीही जिंकलं इस्राइल! अवघ्या 6 दिवसांत संपवलं होतं युद्ध

काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता. अंजली नावाच्या महिलेला फरफटत नेण्यात आलं होतं. ज्यामध्ये अंजलीच्या मृत्यू झाला होता. या घटनेला १० महिने झाले आहेत. इतक्यातचं दिल्लीतील अशाच दुसऱ्या एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Delhi crime news cab driver robbed killed arfter dragged on road Video Surfaces
Game Changer Movie: राम चरण ठरणार 'गेम चेंजर'! चित्रपटानं शुटिंग पुर्ण होण्यापुर्वीच कमावले 250 करोड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com