esakal | Delhi Elections:'आप'ची वाटचाल हॅटट्रिकच्या दिशेने; पक्षाचं कार्यालय सजलं, जल्लोषाची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

delhi election 2020 aam aadmi party may win prediction

मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे.

Delhi Elections:'आप'ची वाटचाल हॅटट्रिकच्या दिशेने; पक्षाचं कार्यालय सजलं, जल्लोषाची तयारी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली Delhi election 2020 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला विजय मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच आम आदमी पार्टीला सकारात्मक वातावरण होतं. सकाळच्या पहिल्या टप्प्यात आपला जवळपास 50 जागांवर आघाडी मिळत असल्याचं दिसत आहे. आम आदमी पक्षानं दिल्लीत 2013, 2015मध्ये सलग दोन निवडणुका जिंकल्या होत्या. त्यामुळं तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून केजरीवाल हॅटट्रिक करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सकाळच्या टप्प्यातील कल जाहीर होत असताना आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हं असल्यामुळं दिल्लीत आम आदमी पक्षात उत्साहाचं वातावरण आहे. आपच्या कार्यालयात सजावट करण्यात आलीय. मिठाईच्या ऑर्डर्स देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना कार्यालयात सकाळपासूनच गर्दी करायला सुरुवात केली आहे. ढोल-ताशे आणि मिठाई, अशी विजयोत्सवाची सगळी तयारी करण्यात आली आहे. 

फटके न उडवण्याचे आवाहन
दिल्लीत प्रदूषणाचा विषय खूपच गंभीर आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या प्रदूषणाचा विषय गांभीर्यानं घेतला आहे. त्यामुळचं विजयाची खात्री असलेल्या केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना फटाके न उडवण्याचे आवाहन केले आहे. 

loading image