Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र सध्या कुठेय? ज्याने आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवलं

Nirbhaya Case
Nirbhaya Caseesakal

नवी दिल्लीः दहा वर्षांपूर्वीच्या निर्भया हत्याकांडाने संपूर्ण जग हादरुन गेलं होतं. १६ डिसेंबर २०२२ रोजीच्या त्या दिवशी निर्भयासोबत बसमध्ये तिचा एक मित्र होता. त्याचीच साक्ष आरोपींना फाशीच्या फंद्यापर्यंत घेऊन गेली.

या प्रकरणामध्ये सात वर्षे तीन महिन्यांनी निर्भयाला न्याय मिळाला. आरोपी अक्षय ठाकूर, मुकेश सिंह, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांच्यासह सहा लोक गुन्ह्यामध्ये सहभागी होते. यामध्ये रामसिंग नावाच्या आरोपीने जेलमध्येच फाशी घेऊन जीवन संपवलं. निर्भयाच्या अवनिंद्र नावाचा मित्राची साक्ष महत्त्वाची ठरली होती.

अवनिंद्र हे गोरखपू जिल्ह्यातले आहेत. सध्या ते चार वर्षांचा मुलगा आणि पत्नीसह एका खाजगी कंपनीमध्ये विदेशात कार्यरत आहेत.

हेही वाचाः काय आहे सलाम किंवा कुर्निसाताचे महत्त्व राजशिष्टाचारांमध्ये

अवनिंद्र यांचे वडील अभिवक्ता भानूप्रकाश पांडे गोरखपूर शहरातच राहतात. त्यांनी सांगितलं की, अवनिंद्र त्या दिवसाला विसरु शकला नाही. भानूप्रकाश त्या आठवणींनी भाऊक होतात.

त्या दिवशी निर्भयाला वाचवू शकलो असतो तर बरं झालं असतं, असे विचार अवनिंद्र करत असतात, असं त्यांच्या वडिलांनी सांगितंल. आरोपींनी बसमध्ये दोघांना बेदम मारहाण केल्यानंतर निर्भयावर अत्याचार केले. चालत्या बसमधून अवनिंद्र आणि निर्भयाला फेकून दिलं. एवढ्या थंडीत त्यांच्या मदतीला कुणीही येत नव्हतं.

Nirbhaya Case
MVA Morcha : उद्याच्या मोर्चात छोटा राजनचा भाऊ होणार सहभागी; कारणही सांगितलं...

''माणसांमध्ये अशी जनावरं असतात, असं कधीच वाटलं नव्हतं. या प्रकरणात अवनिंद्रची साक्ष महत्त्वाची ठरली. चार आरोपी अक्षय ठाकूर, मुकेश सिंह, विनय शर्मा आणि पवन गुप्ता यांना २० मार्च २०२२ रोजी पहाटे ५.३० वाजता फाशीची शिक्षा दिली.'' अशा भावना अवनिंद्रचे वडील भानूप्रकाश यांनी व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com