दिल्लीला हवेत केंद्रांकडून पाच हजार कोटींची मदत; कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडे पैसे नाहीत 

पीटीआय
सोमवार, 1 जून 2020

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद आणि ट्विटरद्वारे केंद्राकडे मदत मागितली आहे. त्यात म्हटले की,कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी दिल्लीकडे पैसे नाहीत.त्यामुळे तातडीने पैसे द्यावे.

नवी दिल्ली - कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन सुरू असताना दिल्ली सरकारने केंद्र सरकारला मदतीसाठी आवाहन केले आहे. दिल्ली सरकारच्या अखत्यारितील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्याने तातडीने पाच हजार कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पत्रकार परिषद आणि ट्विटरद्वारे केंद्राकडे मदत मागितली आहे. त्यात म्हटले की, कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी दिल्लीकडे पैसे नाहीत. त्यामुळे तातडीने पैसे द्यावे. याबाबत त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील आथिॅक मदतीची मागणी करणारे ट्विट केले आहे. सिसोदिया यांच्या मते, कोरोना संसर्ग आणि लॉकडाउनमुळे दिल्ली सरकारची कर वसुली सुमारे ८५ टक्क्याने कमी झाली आहे. त्यामुळे मदतीची गरज आहे. त्याचबरोबर केंद्राकडून अन्य राज्याप्रमाणे आपत्तकालिन निधीतूनही एक रुपयाही दिल्लीला मिळाला नाही. सिसोदिया पत्रकार परिषदेत म्हणाले, की दिल्ली सरकारने महसुलाचा आढावा घेतला आहे. दिल्ली सरकारला वेतन आणि आवश्‍यक खर्चासाठी ३५०० कोटी रुपयांची गरज आहे. आतार्पंत १७३५ महसूल मिळाला आहे. त्याचवेळी ७ हजार कोटी महसूल मिळणे अपेक्षित होते. त्यामुळे ही आर्थिक तूट भरुन काढण्यासाठी केंद्राने तातडीने कर्मचाऱ्यांचे वेतन आणि आवश्‍यक कामकाजासाठी ५ हजार कोटी रुपये द्यावेत, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. 

आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्थमंत्र्यांना पत्र  
दिल्ली सरकारने अर्थमंत्र्यांना पत्र लिहले असून त्यात आथिॅक मदतीची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीला आपत्ती सहायता निधीतून पैसा मिळालेला नाही. मात्र अन्य राज्यांना या निधीतून पैसा मिळाला असल्याचे सिसोदिया यांनी म्हटले आहे. लॉकडाउनमुळे निर्माण झालेल्या आथिॅक अडचणी दूर करण्यासाठी दिल्ली सरकारला तातडीने पैसे द्यावेत, असे नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delhi government appealed to Center for help lockdown due to corona infection