
Delhi rain updates: उत्तर भारतातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट पसरली होती. परंतु शुक्रवारी पहाटे वातावरणात बदल झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. त्यातच राजधानी दिल्लीमध्ये भल्या पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. भारतीय हवामान खात्याने आधीच पावसाचा अंदाज दिला होता. सोबतच वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट तर काही ठिकाणांवर गारपीट होईल, असा अलर्ट दिला होता.