CAG Reports : दिल्ली उच्च न्यायालयाने कॅग अहवाल विधानसभेत सादर करण्यासाठी अधिवेशन आयोजित करण्याच्या याचिकेला फेटाळले. न्यायमूर्ती सचिन दत्ता यांनी सुनावणीदरम्यान कॅग अहवाल सादर करण्यात उशीर झाल्याचे सांगितले.
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या कामकाजासंदर्भातील महालेखापरिक्षकांचे (कॅग) अहवाल सादर करण्यासाठी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळून लावली.