High Court: पीडित मुलीच्या आरोपांची दखल घ्या; उच्च न्यायालय, फक्त वैद्यकीय अहवालावर विसंबून राहू नका
Women Rights: दिल्ली उच्च न्यायालयाने २०१६ च्या मारहाण आणि अडवणूक प्रकरणात आरोपीच्या पत्नीविरोधात आरोपांची पुनः चौकशी करण्याचे आदेश दिले. पीडित मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालात दुखापती नाहीत, तरी तिचे आरोप दुर्लक्षिता येणार नाहीत, असे कोर्टाने स्पष्ट केले.
नवी दिल्ली : ‘केवळ अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणी अहवालात दुखापतींचा उल्लेख नसल्यामुळे तिने केलेल्या थेट आरोपांना फेटाळून लावता येणार नाही,’ असे मत दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.