Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या याचिकेची दखल घेण्यास नकार
Political News : दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाची मान्यता रद्द करण्याच्या याचिकेची दखल घेण्यास नकार दिला आहे. याचिकाकर्ता अश्विनी मुद्गल यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय असल्याचे न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तुषार गेडेला यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान स्पष्ट केले.