

No Spousal Consent Needed for Abortion Delhi High Court Strengthens Women’s Rights
esakal
दिल्ली उच्च न्यायालयाने महिलांच्या अधिकारांशी निगडित दोन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये स्पष्ट निर्णय दिले आहेत. पहिल्या प्रकरणात, गर्भपातासाठी पतीच्या परवानगीची गरज नसल्याचे न्यायालयाने सांगितले. एका महिलेला १४ आठवड्यांच्या गर्भधारणेच्या समाप्तीप्रकरणी दोषमुक्त करताना, न्यायालयाने तिच्या इच्छेविरुद्ध गर्भधारणा चालू ठेवण्यास दबाव टाकता येणार नाही, असे नमूद केले.