
दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांचा राजीनामा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीचे नायब राज्यापाल अनिल बैजल (Anil Baijal) यांनी बुधवारी पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैयक्तिक कारणास्तव त्यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे बैजल यांचे नाव अनेकवेळा चर्चेत होते. दरम्यान, 31 डिसेंबर 2021रोजी त्यांनी पदाची पाच वर्षे पूर्ण केली आहेत. (Delhi LG Anil Baijal Resigns )
कोण आहेत अनिल बैजल
अनिल बैजल हे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी असून, त्यांनी अटबिहारी बायपेयी यांच्या मंत्रिमंडळात गृह सचिव पद भूषवले आहे. 31 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी दिल्ली केंद्रशासित प्रदेशाच्या 21 व्या लेफ्टनंट गव्हर्नर पद स्वीकारले होत. नजीब जंग यांच्या राजीनाम्यानंतर बैजल यांनी डिसेंबर 2016 मध्ये दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळे बैजल यांचे नाव अनेकवेळा चर्चेत होते.
बैजल आणि आप सरकारमध्ये विविध मुद्द्यांवरून नेहमीच वाद होत होते. या वर्षीही कोरोनाच्या चौथ्या लाटेत दिल्ली सरकार आणि बैजल यांच्यात सम-विषम नियमावर एकमत झाले नव्हते. यादरम्यान बैजल यांनी केजरीवाल सरकारचा प्रस्ताव स्वीकारण्यास नकार दिला होता.
Web Title: Delhi Lg Anil Baijal Resigns Citing Personal Reasons
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..