
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज मानवी तस्करी केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली. ‘डंकी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेकायदा मार्गाने त्याने एका व्यक्तीला अमेरिकेला पाठविल्याचा आरोप आहे. गगनदीप सिंग ऊर्फ गोल्डी असे या व्यक्तीचे नाव आहे.