'आप'ला भीती चंदीगढच्या पुनरावृत्तीची! दिल्ली महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ; आता....Delhi Mayor Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delhi Mayor Election

Delhi Mayor Election: 'आप'ला भीती चंदीगढच्या पुनरावृत्तीची! दिल्ली महापालिकेत अभूतपूर्व गोंधळ; आता....

दिल्लीत एमसीडी निवडणुकीनंतर आज महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. यासोबतच उपमहापौर आणि स्थायी समिती सदस्यांचीही निवड होणार आहे. मतदानापूर्वी नगरसेवकांना शपथ घ्यावी लागते. मात्र त्यापूर्वीच आपच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घातला. यादरम्यान धक्काबुक्कीही झाली. (Delhi Mayor Election Huge ruckus at Civic Centre before the commencement of voting)

नामनिर्देशित सदस्यांना पहिल्या शपथविधीला तुम्ही नगरसेवक विरोध करत आहात. तत्पूर्वी, आम आदमी पक्षाने महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक सत्य शर्मा यांची पीठासीन अधिकारी म्हणून एलजीने नियुक्ती करण्यास आक्षेप घेतला. दुसरीकडे, काँग्रेसने या निवडणुकीत मतदानात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

यासर्वामुळे दिल्ली महापालिकेत अभुतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

चंदीगढमध्ये कमी सदस्य संख्या असताना भाजपचा महापौर झाला होता. त्याची पुनरावृत्ती दिल्लीत होऊ नये म्हणून आप सावध झाला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या अनेक नेत्यांनी चंदीगढची पुनरावृत्ती करण्याच इशारा दिला होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आज दिल्ली महापालिकेच अभुतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.

टॅग्स :Bjpdelhiaap