MCD Election: काँग्रेसचं ग्रहण सुटेना, आता दिल्लीतील दोन नेते.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MCD Election Result

MCD Election: काँग्रेसचं ग्रहण सुटेना, आता दिल्लीतील दोन नेते....

Delhi AAP News: काल गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल हाती आहे. गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळालं तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. पण यातच आता दिल्लीत काँग्रेसला एक धक्का बसला आहे.

मंगळवारी महानगरपालिका निवडणुकांचे निकाल हाती आले. यामध्ये २५० पैकी १३४ जागांवर आम आदमी पक्षाने विजय मिळवला. तर भाजप १०४ वार्डांमध्ये उमेदवार निवडून आणता आले. मात्र काँग्रेसला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

हेही वाचाः Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

काँग्रेसचे निवडून आलेले ९ नगरसेवक तरी पक्षात राहतात की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण विजयी होताच दोघा जणांनी आम आदमी पक्षाची वाट धरली आहे.

हेही वाचा: Pankaja Munde : वितुष्ट मिटणार का? पंकजा मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट

दिल्लीतील बृजपुरी वार्डातील काँग्रेस नगरसेवक नाजिका खातून आणि मुस्ताफाबाद वार्डाचे काँग्रेस नगरसेवक सबिला बेगम यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता आपचं महानगरपालिकेतील संख्याबळ आणखी वाढलं आहे.