अखेर 169 दिवसांनी मेट्रो धावली; दिल्लीकरांसाठी मोठा दिलासा!

सकाळ ऑनलाईन टीम
Monday, 7 September 2020

डीएमआरसीने 7 ते 12 सप्टेंबर दरम्यान तीन टप्प्यात सेवा बहाल करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुग्रामम येथील हूडा सिटी सेंटर ते दिल्‍लीतील समयपुर बादली या मार्गावर पहिली मेट्रो धावली. 

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पाच महिन्यापासून बंद असलेली दिल्ली मेट्रो (Delhi Metro) पुन्हा एकदा धावण्यास सुरुवात झाली. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडून  मेट्रो सेवेचा वापर करावा, असे आवाहनही दिल्ली मेट्रो प्राधिकरणाकडून  (DMRC) करण्यात आले आहे. तीन टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या मेट्रो सेवेत  कंटेन्मेंट झोनमधील स्थानकांचा समावेश करण्यात आलेला नाही. गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार टप्प्याटप्यातून मेट्रो सेवा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

बिहारमध्ये भाजपचा व्हर्चुअल प्रचार

त्यानंतर डीएमआरसीने 7 ते 12 सप्टेंबर दरम्यान तीन टप्प्यात सेवा बहाल करण्याची घोषणा केली होती. गुरुग्रामम येथील हूडा सिटी सेंटर ते दिल्‍लीतील समयपुर बादली या मार्गावर पहिली मेट्रो धावली.  पहिल्या टप्प्यात  सकाळी सात ते अकरा आणि दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत मेट्रो धावणार आहे. मेट्रो सेवा पूर्ववत होणे ही दिलासादायक गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो विशेष तपासणीनंतर स्थानकावर प्रवेश देण्यात येत आहे. मेट्रोमध्ये प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delhi metro service will resume from 7 september after 169 days